मुंबई : वाढत्या कोरोना रुग्नसंख्येमुळे देशात कोरोनची दुसरी लाट आल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळं गेल्या काही काही महिन्यात हळूहळू रुळावर येत असलेले अर्थव्यवस्थेची स्थिती पुन्हा एकदा घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पार्श्वभूमीवर व्यापारी बँकांनी कर्ज वितरण सुरळित राखण्याला प्राधान्य देण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे.
सध्याच्या काळात अर्थव्यवस्थेला पुनरूज्जिवित करण्याकरिता कर्ज पुरवठा करणे गरजेचे असल्याचेही बँकांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील राष्ट्रीयीकृत तसेच निवडक खासगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणाचा दाखला देत आर्थिक स्थैर्यतेसाठी साहाय्य करण्याच्या सूचना बँकप्रमुखांना करण्यात आल्या. ग्राहकांना विनाअडथळा सेवा मिळावी याकरिता रक्कम देय तसेच तंत्र यंत्रणेवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकताही दास यांनी यावेळी मांडली.
महत्वाच्या बातम्या
- देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती
- रेमेडेसिवीर ‘व्हेंटिलेटर’ वर! इंजेक्शनचा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करा: पालकमंत्री टोपे
- ‘बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शाह राजीनामा देणार का ?’
- दिपक हुडाच्या अर्धशतकानंतर होतोय कृणाल पांड्या होतोय ट्रोल
- जालन्यात बाजारपेठ हाऊसफुल; दागिने, कपडे खरेदीला प्राधान्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

