जालना: कोरोना महामारीचा कहर वाढत असल्याने शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने लावलेले कडक निर्बंध मागे न घेतल्यास सोमवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने शुक्रवारी झालेल्या शहरातील विविध असोसिएशनचे तसेच तालुक्यातील व्यापारी संघटनांच्या बैठकीत दिला होता, परंतू गेल्या दोन दिवसात निर्बंध शिथील करण्याबाबत शासनाकडून कोणताच निर्णय न झाल्याने बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडून कायदेभंग केला आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या दुकानांना निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा सर्वांनी निषेध केला होता. सरकारने अंशत: लॉकडाऊन संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा सर्व व्यापारी वर्ग समाधानी नसतांनाही आपापली दूकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला होता, परंतू आता पूढे हे कडक निर्बंध सरकारने सोमवार सकाळपर्यंत मागे घेऊन व्यापार खुला केला नाही तर जिल्ह्यातील सर्व व्यापारी कायदेभंग करून परंतू कोरोना ससंर्गच्या सुरक्षा नियमाचे पालन करून आपापली दुकाने उघडतील असा इशारा प्रशासनास देण्यात आला होता.
एक तर संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घ्या नाहीतर सर्व व्यापारी दुकाने उघडण्यास परवानगी द्या, नाही तर सोमवारपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त असलेली इतर दूकाने सुध्दा सोमवारपासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार आज सोमवारपासून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून निर्बंधाचे आदेश झुगारले. जुना जालन्यातील नुतनवसाहत, शनिमंदिर परीसरात मात्र कुठे बंद तर कुठे चालू असे दृष्य पहावयास मिळाले तर नवीन जालन्यात सराफा, फुलबाजार, मामाचौक, महावीर चौक, अलंकार, नेहरू रोड, दानाबाजार, कपडा बाजार, शिवाजी पुतळा, काद्राबाद, पाणीवेस, बडीसडक आदी भागात दुकाने सुरू करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- थरारक सामन्यात पंजाबच ठरला किंग; सॅमसनची झुंजार खेळी व्यर्थ
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी
- पैठणच्या शेतकऱ्याचा माल थेट दिल्लीत
- १५ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावल्यास जनतेचे समर्थन : चंद्रकांत खैरे
- सिटीस्कॅन केंद्रानी स्थानिक प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक : जिल्हाधिकारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

