Share

दिपक हुडाच्या अर्धशतकानंतर होतोय कृणाल पांड्या होतोय ट्रोल

Published On: 

मुंबई : आयपीएलमधील सोमवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघाचा आखेरच्या चेंडुवर चार धावांनी विजय मिळवला. पंजाबने दिलेल्या २२२ धावांच्या बलाढ्य धावसंख्येपुढे राजस्थान रॉयल्सने जोरदार लढत देत सामना खेचून आणला. मात्र आखेरच्या चेंडुवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना कर्णधार सॅमसन हा बाद झाला.

या सामन्यातील पहिल्या डावात पंजाबकडून दीपक हुडाने धडाकेबाज खेळी करत अवघ्या २० चेंडुत अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने ६ उत्तुंग षटकार लगावले. मात्र दिपक हुडाच्या या खेळीनंतर सोशल मीडीयावर कृणाल पांड्याला ट्रोल केले जात आहे. कारण कृणाल पांड्यामुळे दीपक हुडावर एक वर्षाची बंदीची नामुष्की आली होती. कृणाल आणि दीपक हे दोघेही बडोद्याचे खेळाडू आहेत. जानेवारी महिन्यात बडोद्याचा संघ बीसीसीआयची स्पर्धा खेळण्यासाठी आला असता कृणालने दीपक हुडाचा अपमान केला होता. ही गोष्ट दीपकने स्वत: सांगितली होती.

यानंतर कृणालवर कारवाई होईल अशी अपेक्षा दीपकला होती. मात्र बडोद्याच्या क्रिकेट मंडळाने दीपक हुडावर एक वर्षाची बंदी घालण्याची कारवाई केली. त्यामुळे दीपक हुडाचे नुकसान झाले. मात्र सोमवारी केलेल्या खेळीत त्याने हे नुकसान भरुन काढले. दीपकने कृणालचा राग चेंडूवर काढला, असेही एका चाहत्याने म्हटले आहे. जेव्हा मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना होईल, या सामन्यात दीपक कृणालच्या गोलंदाजीवर कशी फटकेबाजी करतो, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!