कोलकाता: देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू ,केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या निवडणुकीत बंगाल ची निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनली आहे. येथे मोदी विरूद्ध ममता असाच प्रचार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून सुरू आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजावर वादग्रस्त विधान केले होते. यातच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ममता यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. सोमवार रात्रौ ८ वाजल्यापासून ही बंदी लागू झाली आहे.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद प्रचारासाठी लावली आहे. भाजपाकडून सोमवारी बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन रॅली होत आहेत, शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील रोड शो करणार आहेत. यावरुनच एकेकाळी भाजपाच्या कोअर ग्रुपमध्ये असणारे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राहिलेले व अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
Will PM and HM resign if they lose the Bengal elections? Given the stakes they have themselves raised in these elections this is the least they shd do if they have any self-respect left. But I know I am expecting too much from these people without dignity.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) April 12, 2021
‘बंगालच्या निवडणुका हरल्यास पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार का?’ असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी विचारलाय. ‘या निवडणुकीत ते स्वतः ज्याप्रकारे प्रचारात उतरलेत…त्यानंतरही जर पराभव झाला तर स्वाभिमान राखून त्यांनी किमान राजीनामा द्यायला हवा…पण प्रतिष्ठा नसलेल्या लोकांकडून मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय हे मला माहित आहे’, अशा आशयाचं ट्विट सिन्हा यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- थरारक सामन्यात पंजाबच ठरला किंग; सॅमसनची झुंजार खेळी व्यर्थ
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी
- पैठणच्या शेतकऱ्याचा माल थेट दिल्लीत
- १५ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावल्यास जनतेचे समर्थन : चंद्रकांत खैरे
- सिटीस्कॅन केंद्रानी स्थानिक प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक : जिल्हाधिकारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

