नवी दिल्ली : देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू ,केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. दरम्यान सध्या निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज १३ एप्रिल पासून ते पदभार स्वीकरणार आहेत. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्या ची परंपरा असते यानुसार सुशील चंद्रा यांची या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
Sushil Chandra appointed as the Chief Election Commissioner with effect from 13th April, a day after incumbent CEC Sunil Arora demits office. pic.twitter.com/51V9UPV01I
— ANI (@ANI) April 12, 2021
त्यांच्या आधी सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती. तर चंद्रा यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमधील निवडणूका पार पाडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- थरारक सामन्यात पंजाबच ठरला किंग; सॅमसनची झुंजार खेळी व्यर्थ
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी
- पैठणच्या शेतकऱ्याचा माल थेट दिल्लीत
- १५ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावल्यास जनतेचे समर्थन : चंद्रकांत खैरे
- सिटीस्कॅन केंद्रानी स्थानिक प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक : जिल्हाधिकारी


