मुंबई: मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाने खऱ्या अर्थाने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना शतक केले तर गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या आहे. त्याच्या या कामगिरीचे सगळीकडून कौतुक होत असताना भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने ही जडेजाची सर्व श्रेष्ठ कामगिरी नव्हती असे सांगितले आहे.
रवींद्र जडेजाच्या (ravindra jadeja) खेळीबद्दल बोलताना गंभीरने (gautam gambhir) सांगितले “ही त्याची सर्वात श्रेष्ठ खेळी आहे असे मला वाटत नाही. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियात खेळलेली खेळी किंवा भारताबाहेर खेळलेली खेळी, त्यातून त्याला अधिक आत्मविश्वास मिळेल असे वाटते. आकडेवारी खूप दिशाभूल करणारी असू शकते. शतकानंतर एक काळ असा होता की तो फक्त धावत होता, जेव्हा धनंजया डी सिल्वा, असलंका आणि एम्बुल्डेनिया गोलंदाजी करत होते पण जर तुम्ही ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडबद्दल बोललो तर, या खेळीपेक्षा ४० किंवा ५० धावांचे योगदान कदाचित अधिक महत्त्वाचे आहे.”
गौतम गंभीरने सांगितले की या १७५ धावा रवींद्र जडेजाच्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि इतर ठिकाणी परदेशातील परिस्थितींमध्ये खेळण्याचा परिणाम आहे.तो म्हणाला “या १७५ धावा रवींद्र जडेजाने परदेशातील परिस्थितीत कशाप्रकारे फलंदाजी केली याचे परिणाम आहे. तुम्हाला फक्त अंतिम परिणाम दिसतो पण या १७५ धावांपर्यंतची आघाडी त्यासाठी खूप मेहनत घेतली गेली, त्याने अतिशय कठीण परिस्थितीत धावा केल्या आणि त्यामुळेच त्याला ६ व्या किंवा ७व्या स्थानावर फलंदाजी करायची संधी मिळाली.”
महत्वाच्या बातम्या
- “…तर अजित पवारांना फासावर लटकवणार का”, देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
- “वैराग्याच्या काळातही बगल में छुरी…”; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका
- मुलाला मिळेना बॉलीवूडमध्ये काम; म्हणून ही मराठी अभिनेत्री आहे चिंतेत !
- वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, तर ‘या’ दिग्गजांना दिला डच्चू
- Russia-Ukraine war : ११ वर्षाच्या मुलाचा थक्क करणारा प्रवास; वाचा सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

