🕒 1 min read
नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक नागरिक युक्रेन सोडत आपल्या मायदेशी परतत आहेत. तर युक्रेनमधील रहिवासीही आपल्या सुरक्षेसाठी इतर देश गाठत आहेत. आतापर्यंत १० लाखांपेक्षा आधील नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. मात्र अशातच एक माहिती समोर आली आहे, जी वाचून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
एका ११ वर्षीय युक्रेनियन मुलाने एक बॅकपॅक, त्याच्या आईची चिठ्ठी आणि हातावर लिहिलेला टेलिफोन नंबर घेऊन १ हजार किलोमीटरचा प्रवास एकट्याने केल्याची माहिती समोर आली आहे. (11-year-old boy traveled 1000 km) एवढा प्रचंड प्रवास करत तो स्लोव्हाकियामध्ये पोहोचला आहे. स्लोव्हाकियाच्या गृह मंत्रालयाने त्याला ‘सुपर हिरो’ म्हणत त्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान या मुलाकडे त्याच्याकडे प्लास्टिकची पिशवी, पासपोर्ट आणि घडी घातलेल्या चिठ्ठीत एक मेसेज होता. त्याच्या हातातील फोन नंबर व्यतिरिक्त त्याच्या पासपोर्टमध्ये दुमडलेल्या कागदाचा तुकडा होता. त्यावर लिहिलेल्या माहितीच्या आधारे सीमेवरील अधिकाऱ्यांनी राजधानी ब्रातिस्लाव्हा येथील त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्या हवाली त्याला केले. दरम्यान या मुलाचे धाडस सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
कांदा बीज उत्पादक शेतकरी हवामान बदलामुळे संकटात; शासनाकडे केली ”ही” मागणी!
-
“बाळासाहेबांनंतर खरे हिंदुहृदयसम्राट फडणवीस”, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
- “…पण तुम्हाला आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही”, पडळकरांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
