Share

IPL 2022 : रवींद्र जडेजाला CSK च्या राखीव खेळाडूंबाबत पडला ‘हा’ प्रश्न

Published On: 

कानपूर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने आयपीएल (IPL) मधील कायम ठेवण्याऱ्या खेळाडूंच्या यादीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. त्याच्या ट्विटवरून असे दिसते की जडेजाला कदाचित सीएसके संघ कायम ठेवेल.

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत संपत आली आहे आणि म्हणूनच सर्व फ्रँचायझी त्यांच्या संबंधित खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवण्याच्या बातम्या समोर येत आहेत.

एक वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीशिवाय ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा यांना कायम ठेवले आहे. मोईन अलीलाही आणल्याची चर्चा आहे, तो आला नाही तर सॅम करणला कायम ठेवण्यात येईल.

चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर CSK चाहत्यांना एक प्रश्न विचारला आणि रवींद्र जडेजाने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. चेन्नई सुपर किंग्सने चाहत्यांना विचारले की त्यांना कोणत्या खेळाडूंना कायम ठेवायचे आहे. यावर जडेजा म्हणाला, मी सांगू का?

रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तिन्ही विभागात चांगली कामगिरी करतो. कदाचित याच कारणामुळे CSK संघ त्याला सोडू इच्छित नाही. आगामी मोसमात जडेजाची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. मात्र, आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या वेळी सुरेश रैनाला संघात कायम ठेवता येणार नाही. यावेळी रैनाची सुटका होऊ शकते. आयपीएल २०२१ मध्ये त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!