Share

रविकांत तुपकरांच्या गाडीचा अपघात; दोघेजण जखमी

Published On: 

बुलढाणा :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)कापूस व सोयाबीनचा प्रश्न घेऊन आंदोलन करत आहेत. सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.

तसेच शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू  नये, अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन १७ नोव्हेंबरपासून सुरू केले होते.

शासनालाने या पिकाला योग्य तो भाव देण्याची रविकांत तुपकरांची मागणी आहे. दरम्यान, सोयाबीन-कापुसच्या मागणी बाबत मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना रविकांत तुपकर यांच्या गाडीला काल ( २२ नोव्हेंबर ) रात्री साडेनऊच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तुपकर यांच्या गाडीचेही या अपघातात खूप नुकसान झाले आहे.

२४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईला बैठक होत आहे. यासाठी चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण भरधाव बेराळ्याकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर आदळली आणि यात हे दोघे तरूण जखमी झाले.

गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत. अपघात घडताच तुपकरांनी दोघांनाही आपल्या वाहनात घेऊन चिखली येथील डॉ. महिंद्रे रुग्णालयात दाखल केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!