🕒 1 min read
उस्मानाबाद : तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला ३० हजार, तर इतर दिवशी २० हजार दर्शन पास देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्याचबरोबर सशुल्क दर्शन ३०० रुपयांऐवजी २०० रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थान विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी कोरोनामुळे रखडलेल्या मंदिरातील होमकुंड, साडी आदी उत्पन्नाच्या बाबींच्या लिलावांना मुदतवाढ देण्यात आली. सशुल्क दर्शनासाठी प्रती व्यक्ती ३०० रुपये शुल्क कमी करून पूर्वीप्रमाणे १०० रुपये करण्याची मागणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केली होती. पण कोरोनाचा प्रभाव असल्याने सशुल्क दर्शनासाठी २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेची कुलधर्म कुलाचार पूजेचा निर्णय १५ फेब्रुवारीनंतर होणार आहे. मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी २२ कोटी २० लाख रुपयांची तरतूद, अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तरतूद, सैनिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करणे आदी निर्णय बैठकीत घेण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना युध्दात आपला जीव गमावणाऱ्या पोलीस हवालदाराच्या वारसांना मिळाली ६० लाखांची मदत
- ‘महाराष्ट्र देशा’ थेट साष्टपिंपळगावात, मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिणगीचे मशालीत रुपांतर
- चिनी कंपनी VIVO साठी आयपीएलचे दार पुन्हा उघडणार; बनू शकते टायटल स्पॉन्सर
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- राम लल्ला हम आयेंगे, राज ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर !


