Share

तुमच्या हिम्मतीला सलाम करतो, बच्चू कडू उतरले राकेश टिकेत यांच्या समर्थनात !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील अन्नदाता गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बसला आहे. या आंदोलनाची धग देशभरात पोहचत असताना प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना हटवून सीमा मोकळ्या करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलन संपणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गाझीपूर सीमेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला. त्यांनी तंबू, शौचालयं हटवण्याचं काम सुरू केलं. भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकेत यांनी आंदोलन संपवत असल्याचे संकेत दिले होते. तर लाल किल्यातील हिंसाचाराचा निषेध करत दोन शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकरी आंदोलन संपणार अशी चिन्हं दिसू लागली. मात्र गेल्या काही तासांत चित्र पूर्णपणे पालटलं आहे.

मात्र, रात्री उशिरा पोलिसांनी टिकेत यांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला. माध्यमांशी संवाद साधताना टिकेत यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर आंदोलनस्थळावरील परिस्थिती बदलली. राकेश टिकेत यांचे बंधू नरेश टिकेत यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा मुझफ्फरपूरमध्ये केली.

त्यानंतर रातोरात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली. सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला. त्यांना कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. गेल्या काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.

या सगळ्यात राकेश टिकेत यांनी मला फाशी द्या किंवा गोळी घाला मी शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल असा एल्गार पुकारला आहे. राकेश टिकेत यांच्या याच लढाऊ बाण्याला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सलाम केला आहे. तुमच्या धैर्याला मी सलाम करतो, या अहंकारी सरकारच्या विरोधातील लढाईत आमचा तुम्हाला पाठींबा असल्याचे ट्विट बच्चू कडू यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!