🕒 1 min read
नळदुर्ग : उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाचे तिर्थक्षेत्र नळदुर्ग येथील मैलारपूर येथील खंडोबा यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे येथे भरणारी यात्रा प्रशासनाने रद्द केली. २७-२९ जानेवारी २०२१ या कालावधीत खंडोबाची यात्रा भरणार होती. यादिवशी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दरम्यान मंदिराकडे जाणारे सगळे मार्ग पोलीस प्रशासनाने बंद केले होते.
अनेकदा नैसर्गीक आपत्ती आली, पण यात्रेत कधीही ही खंड पडला नाही. पण कोरोनाच्या संसर्गामुळे शेकडो वर्षाची यात्रा भरली नाही. भाविकांच्या अनुपस्थितीत यात्रा कालावधीत होणारे धार्मीक कार्यक्रम पार पडले आहेत. यात्रा कालावधीत मैलारपुरात भावीक येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, नळदुर्ग नगरपालिका, महामार्ग पोलिस, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांनी अथक प्रयत्न केले.
यात्रा कालावधीत मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: फुलून गेलेला असतो, पंरतू यावर्षी मदिंर परिसरात स्मशान शांतता होती. या कालावधीत विविध प्रकारची दुकाने थाटलेली असतात. यंदा मात्र यात्रेच्या मुख्य दिवशी एकही दुकान उघडले नव्हते. यात्रा रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहेत. तसेच दरवर्षी होणारी भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा रद्द करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- खळबळजनक! खा.जलील 100 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आणणार
- धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन
- मुंबईकरांवर लोकल प्रवासासाठी वेळेचं बंधन; मनसेची खोचक टीका
- ‘समान गुण असूनही प्रवेश मिळण्यास अडचण’, साष्टपिंपळगावच्या विद्यार्थ्यांची खंत
- “भारताला भारतात नमविणे कठीणच”


