Share

कोरोना : सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी, तर राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम !

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षीपासून देशासह जगभरात कोरोना या नव्या रोगाने हाहाकार माजवला होता. या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु आली. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका हा कायम असून या रोगाला पूर्णपणे आला घालण्यासाठी लॉकडाऊनचे नियम व कालावधी २८ फेब्रुवारी पर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

आज राज्य सरकारने परिपत्रक काढून नव्या नियमावलीची माहिती दिली आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी ब्रिटनमधील धोकादायक स्वरूपाचा आढळलेला कोरोनाचा संसर्ग संक्रमित होऊ नये यादृष्टीने अधिक खबरदारी बाळगली जात आहे. या दरम्यान आधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहतील असेही स्पष्ट करण्यात आलं आहे तर कंटेन्मेंट क्षेत्रातील लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला होता. यानंतर कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली होती. त्यावेळी ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली होती त्या आताही सुरु राहणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.

या सूचना बंधनकारक

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
  • सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक
  • साबणाने सतत हात धुणे आवश्यक

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!