जालना : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर काल ईडीकडून छापे टाकण्यात आले. यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नसून राज्य सरकार त्यांचे अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ते जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील वडेट्टीवार, भुजबळ हे मंत्री मोर्चे काढत आहेत. तर दुसरीकडे हेच सरकार ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवेंनी केला. तसेच राऊत यांची चावी फिरविली की तेवढेच बोलतात, नंतर भलतेच बोलतात, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर केली.
ते म्हणाले, संजय राऊत हे आमचे मित्र आहेत आणि संजय राऊत जे बोलतात ते त्यांचे मत नसते तर त्यांचा बोलावता धनी त्यांना बोलायला भाग पाडतो असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्याची आमची भूमिका आहे. मात्र, निवडणुका घेतल्या तर त्या ठिकाणी भाजपा ओबीसीचे प्रतिनिधी निवडणुकीत देणार असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. ओबीसींचं जे आरक्षण रद्द झाले आहे,त्याचा केंद्र सरकारशी संबंध नाही. इंपेरियल डेटा हा मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून राज्य सरकारने कोर्टाला दिला नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. जो पर्यंत इंपेरियल डेटा राज्य सरकार कोर्टाला देणार नाही तो पर्यंत आरक्षणाला स्थगिती असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दानवेंच्या विनोद शैलीचे कौतूकच
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही रावसाहेब दानवेंनी याच शब्दात राऊतांवर टीका केली होती. यावर राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. राऊत म्हणाले, ‘दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचे कुलूप उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागलं असे म्हणत पलटवार केला. याचबरोबर ‘रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र आहेत, कधी कधी ते विनोद करतात. त्या विनोदी शैलीचे मी कौतुक करतो’.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी सरनाईकांबद्दल निर्णय घेतलाय, लवकरच बातमी कळेल’, राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
- ‘या’ मित्रांमुळेच मी तुरुंगात होतो; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट!
- इलेक्ट्रॉनिक दुचाकी मोदी सरकारच्या निर्णयामुळे स्वस्त
- …अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल; फडणवीसांची घोषणा
- कॉंग्रेसने स्वबळाची भाषा केल्यानंतर राष्ट्रवादीनेही सुरु केली जोरदार मोर्चेबांधणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
