लातूर – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील जोरदार कामाला लागल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील परिवार संवाद दौऱ्याला मराठवाड्यातून सुरुवात झाली असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते या दौऱ्यात त्यांच्यासोबत असणार आहेत.परिवार संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला होता.त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने यापुढील दुसरा टप्प्यातील दौरा स्थगित करण्यात आला होता. यानंतर आता याच दौऱ्याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातून पुन्हा सुरू झाला आहे.
११ दिवसात ४६ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे थेट संवाद साधणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे कमी पडले याची माहिती जाणून घेतानाच आता येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कशी मात द्यायला हवी याबाबतचा आढावा जयंत पाटील घेत आहेत.
पक्षसंघटना बळकट असेल तर निवडणुकीला सामोरे जाताना याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असा दावा पाटील यांचा आहे. सोबतच बुथ कमिट्या ताकदवान करा, याच बुथ कमिट्या उद्या आपला पक्ष सक्षमपणे उभा करतील. लोकांचे प्रश्न जर हातात घेतले तर आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचेल. आपण कायम जर लोकांसाठी लढतोय हे चित्र तयार केले तरच आपला पक्ष वाढेल असं देखील पाटील या दौऱ्यात सांगत आहेत.
दरम्यान, एका बाजूने राष्ट्रवादी तर दुसऱ्या बाजूने कॉंग्रेसने देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सध्या धुसफूस सुरु असून कॉंग्रेस स्वबळाची भाषा करत असल्यानेच हा परिवार संवाद दौऱ्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला का असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

