Share

‘या’ मित्रांमुळेच मी तुरुंगात होतो; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट!

Published On: 

पुणे : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे एकीकडे भाजप चक्का जाम आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे लोणावळ्यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून लोणावळ्यात ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला तुरुंगात का जावे लागले यावरही भाष्य केले. ‘पाच वर्ष सगळी कामे करून घेतात. निवडणूक आली की म्हणतात ही माळी कुंभार वंजारी. आमचा मतदारसंघ राखीव नाही त्याच कारण आमच्या मतदारसंघात कोणी उभे राहू शकतात. मतदारसंघात जाव लागते सगळ्यांना बरोबर घ्याव लागतं, हे ही समाजाने समजून घेतले पाहिजे. छगन भुजबळ घाबरत नाही कोणाला. खूप हातोडे झेलले आहेत. काही मित्रांच्या कृपेमुळे मी जेलमध्ये जाऊन आलो. जाती म्हणून काही मिळणार नाही पण ओबीसी समाज म्हणून एकत्रित आलात तर नक्की चांगले मिळेल, असे भुजबळ म्हणाले.

इम्पॅरिकल डाटा कोणाची खासगी मालमत्ता नाही, कोर्टात केंद्र सरकार ओबीसी डाटा सादर का करत नाही. जो डेटा आहे ती कोणाच्या घरची संपती नाही. तो दिला पाहिजे. डेटा ठेऊन काय पुजायच आहे का? मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय हा संपूर्ण देशाला लागू आहे म्हणून तुम्ही मोदी यांना भेटा. तुमचं नेतृत्व मान्य करायला आम्ही तयार आहे’, असेही ते म्हणाले.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, असं भुजबळांनी नमूद केलं. केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डाटाची मागणी आम्ही करतोय. भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत असा आरोप त्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!