नवी दिल्ली: देशावर आलेल्या या कोरोना संकटामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यातच सरकारने घातलेल्या त्रीसूत्रणांचे पालन करणं व बंधनकारक आहे. यात सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करण्यासाठी तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्यासाठी अनेक लोक सार्वजनिक वाहनाचा वापर टाळून खाजगी वाहन वापरण्यासाठी अधिक भर देतात.
लॉकडाऊनमुळे मध्यंतरी विक्री मंदावल्याने दुचाकी आणि चारचाकी स्वस्तही झाल्या होत्या. अशातच भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वाहनांनी प्रवेश केला होता. इंधनाचे वाढलेले दर पाहता इलेक्ट्रॉनिक वाहने ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक स्कुटर खरेदी करणे आता सोपे झाले आहे, कारण मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आणला आहे.
FAME II नियमात सुधारणा झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकींवर जादा अनुदान मिळेल. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक दुचाकींवर प्रति kWh 10 हजार रुपये अनुदान मिळत असे. आता त्यामध्ये ५ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक्स वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कमी झालेल्या इलेक्ट्रॉनिक स्कुटरच्या किंमती –
TVS iQube – 11,250 रुपयांनी कमी
Okinawa iPraise+ – 7,200 ते 17,900 रुपयांनी कमी
RV 400 – 28,200 रुपयांनी कमी
महत्वाच्या बातम्या
- सलमानशी पंगा पडला महागात; केआरकेने मागितली माफी
- इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का ; जोस बटलर एकदिवसीय मालिकेतून बाहेर
- ‘मी आता स्वत: श्वास घेत आहे’; ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध दवेची कोरोनावर मात
- जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

