Share

…अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल; फडणवीसांची घोषणा

Published On: 

नागपूर : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपाचं आज राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन सुरू आहे.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी व्हेरायटी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्यातील ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार मोदी सरकारवर खापरं फोडतं. माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन,’ अशा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

तसेच ‘आम्ही ५० टक्क्यांच्या वरील असलेलं आरक्षण न्यायालयात वाचवून दाखवलं. त्यासाठी राम शिंदे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मंत्र्यांनी अतिशय उत्तम काम केलं. पण महाविकास आघाडी सरकारनं वेळकाढूपणा करत आरक्षणाचा मुडदा पाडला,’ असा घणाघात देखील त्यांनी यावेळी केला.

दरम्यान आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या विविध भागांत आज भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. पुण्यात देखील भाजप नेत्यांनी आंदोलन करुन सरकारला जाब विचारला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!