Share

‘मुख्यमंत्र्यांनी सरनाईकांबद्दल निर्णय घेतलाय, लवकरच बातमी कळेल’, राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Published On: 

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरनाईक यांच्याबद्दल निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची बातमी कळेल, असे भुवया उंचावणारे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.

राऊत यांनी आज शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी हा महत्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, ‘प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो. त्यांनी खुलासा केला की मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितलं मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. प्रताप सरनाईकांबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल.’

‘शिवसेना पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण माझी आज चर्चा ही आमच्या पक्षप्रमुखांशी झाली. संघटनात्मक गोष्टींवर चर्चा झाली. पक्ष मजबूत असेल तर सरकार अधिक काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. संघटनेचे कामं करणं गरजेचं आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू होतंय, त्या संदर्भात मुख्यमंत्र्याचे त्यावर काम सुरू आहे’ असं राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विकासाविरोधात कोणी काहीही ढोल बडवले, तरी हे राज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्यांचा कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!