मुंबई : राज ठाकरे यांची काल मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार जेव्हा भाषण करतात तेव्हा ते फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. पण ते कधीही शिवरायांचा महाराष्ट्र असे म्हणत नाहीत. या आरोपाला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.
आज पत्रकार परिषद घेत पवारांनी राज ठाकरे यांच्या सर्व आरोपांचं खंडन केलं. म्हणाले, “माझा धर्म आणि देव याचं मी प्रदर्शन करत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. बारामतीत. त्याचा मी गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे काही आदर्श आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श आहेत. त्याचं लिखाण वाचलं तर त्याचं सविस्तर मार्गदर्शन होईल”.
देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली. गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो. कुटुंबातील लोकं वाचत असतील असं नसावं. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा” – शरद पवार
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, सभेत उंचावली होती तलवार
“तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
“सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाही” आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं
“…मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का?”, सिल्व्हर ओक प्रकरणी प्रवीण दरेकरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

