मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सततचा प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला ही माहिती चुकीची असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची अजित पवार, सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट घेत विचारपूस केली आहे. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती असून राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने याची तयारी केली. धनंजय तू आधी बरा हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून यशस्वी करू.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेतेमंडळींनी त्वरित धाव घेतल्याचे दिसून आले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेले धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश करून केली. 2012 मध्ये त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आज ते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 MI vs PBKS : आज मुंबई मिळवणार का पहिला विजय? पंजाबविरुद्ध ‘असा’ आहे रोहितसेनेचा रेकॉर्ड!
“माझ्या धर्माचं मी प्रदर्शन करत नाही”; शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज ठाकरेंची भूमिका ही दंगल घडविणारी; प्रकाश आंबेडकरांची टीका
“महाविकास आघाडीतील बेवडे हर्बल गांजाचा धुर काढत…”; सदाभाऊंची खोचक टीका
INS Vikrant घोटाळा : किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

