Share

IPL 2022 : हॅट्स ऑफ माही..! विराटला आऊट करण्यासाठी धोनीनं खेळली ‘सुंदर’ चाल; VIDEO व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भन्नाट सामना पाहायला मिळाला. चौकार-षटकारांच्या आतषबाजी झालेल्या या सामन्यात तब्बल ४०० धावा ठोकल्या गेल्या. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात चेन्नईने यंदाचा पहिला विजय साकारला. धोनीने यंदा चेन्नईचे नेतृत्व जडेजाकडे सोपवले असले, तरी सामन्यात तो जडेजाला रणनिती आखण्यात मदत करतो. कालच्या सामन्यात धोनीच्या तल्लख बुद्धीचा प्रत्यय सर्वांना आला.

धोनीने आपल्या एका युक्तीने विराट कोहलीला तंबूत धाडले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईला मोसमातील पहिला विजय नोंदवण्यासाठी कोहलीला लवकर बाद होणे आवश्यक होते. तसे करण्यात चेन्नईला यश आले नसते, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. चेन्नईच्या गोलंदाजीच्या वेळी पाचवे षटक टाकण्यासाठी मुकेश चौधरी आला. या ओव्हरपूर्वीच धोनीने अचानक फाइन लेगवर उभ्या असलेल्या शिवम दुबेला डीप स्क्वेअर लेगला जाण्यास सांगितले.

मुकेशने ओव्हरचा पहिला चेंडू थोडा शॉर्ट टाकला, त्यावर कोहलीने एरियल शॉट खेळला आणि चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. जिथे शिवम दुबे आधीच तैनात होता. त्याने कोहलीचा सोपा झेल घेतला. धोनीच्या या एका युक्तीने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतण्यास भाग पाडले. कोहलीला फक्त एक धाव करता आली.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने आरसीबीला २१७ धावांचे लक्ष्य दिले होते. विराट आणि फाफ डु प्लेसिसच्या विकेट्स लवकर गमावल्यानंतर आरसीबीने हे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण संघाला २० षटकांत ९ गडी बाद १९३ धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!