पुणे : आयपीएल २०२२चा २३वा सामना पंजाब किंग्ज आणि पाच वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगेल. गुणतालिकेत पंजाबचा संघ सातव्या तर मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने १४ सामने जिंकले असून पंजाब किंग्जने १३ सामने जिंकले आहेत. या मोसमातील उभय संघांमधील हा पहिला सामना आहे. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक ७४० धावा केल्या आहेत.
शिखर धवनने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध २६ आयपीएल डावांमध्ये ८०१ धावा केल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने आणखी २४ धावा केल्या तर तो मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहने पंजाब किंग्जविरुद्ध १९ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
- विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करावे; प्रकाश आंबेडकरांची मागणी
- “मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा” – शरद पवार
- राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, सभेत उंचावली होती तलवार
- “तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
- “सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाही” आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


