नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. देशात देखील कोरोनाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्याचे आवाहन केले होते. त्याला आता टाटा ग्रुपने सकारत्मक प्रतिसाद दिला आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशात उद्योजक रतन टाटा पुन्हा एकदा देशाच्या मदतीला धावून आले आहेत. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवहानानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे २४ लिक्विड ऑक्सिजन वाहक कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांना केलेलं आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला आहे, असं ट्विट टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.
PM @narendramodi's appeal to the people of India is laudatory and we at the Tata Group, are committed to doing as much as possible to strengthen the fight against #COVID19. To mitigate the oxygen crisis, here is one such effort to boost health Infrastructure.
— Tata Group (@TataCompanies) April 20, 2021
The Tata group is importing 24 cryogenic containers to transport liquid oxygen and help ease the oxygen shortage in the country. #ThisIsTata@PMOIndia @narendramodi @AmitShah
— Tata Group (@TataCompanies) April 20, 2021
दरम्यान, यापूर्वीच करोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्ही देखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू, टाटा ग्रुपने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जीवावर बेतणाऱ्या ढीसाळ कारभाराचा प्रकाश आंबेडकरांनी केला निषेध
- ‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या रेल्वेचा खोळंबा, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
- नाशिकच्या घटनेने मन सुन्न, मी निःशब्द – तुकाराम मुंढे
- ‘फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- नैराश्यात गेलेल्या तरुणाईसाठी औरंगाबादेत मोफत समुपदेशन मोहीम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

