मुंबई : नाशिक महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहे. या घटनेला दोषी असणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अशा लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या कारभाराचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
नाशिक मधील रुग्णालयात घडलेल्या या दुर्देवी घटनेबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘नाशिक येथे महानगरपालिकेच्या रुग्णालयात oxygen वायू गळती होऊन त्या अभावी २२ रुग्णांचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे. लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या ढिसाळ कारभाराचा आम्ही निषेध करतो.’
नाशिक येथे महानगरपालिकेच्या रुग्णालयात oxygen वायू गळती होऊन त्या अभावी २२ रुग्णांचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे.घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे. लोकांच्या जीवावर बेतणार्या या ढिसाळ कारभाराचा आम्ही निषेध करतो.#NashikOxygenLeak
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 21, 2021
या घटनेबाबत देशभरातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यात या घटनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विकास दर टिकवण्यासाठी उद्योग आणि सरकारमध्ये पूर्ण विश्वास हवा’
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप


