औरंगाबाद : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारने लाॅकडाऊन करत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवल्या आहेत. शहरातील असंख्य दुकाने, उद्योग जवळपास मागील वीस दिवसांपासून बंद आहे. यामुळे असंख्य तरूण डिप्रेशन मध्ये जात आहेत. यातुन आत्महत्या करण्यापर्यंत अनेकांची मजल जात आहे. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अक्षय बाहेती यांनी या तरुणांसाठी या क्षेत्रातील तज्ञांद्वारे मोफत प्राथमिक काऊन्सेलिंग करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
युवकांना कोरोनाची लागण झाल्यावर नेमके काय करायला हवे हे कळत नाही व तसेच आहार काय घ्यावा हेही कळत नाही. म्हणूनच या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने या युवकांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केले जाणार आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने हे तरूण हा आजार अंगावर काढणार नाहीत कारण योग्यवेळी उपचार सुरू न केल्यामुळे हा आजार वाढत जातो. आणि तो रूग्ण गंभीर होऊन जातो.
तणावग्रस्त तरूण आणि विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी या क्षेत्रात मागच्या १५ वर्षापासून कार्यरत असलेले ऋषिकेश बाहेती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे व तसेच कोरोना संदर्भात डाॅ. अनिकेत चाटे हे तज्ञ समुपदेशन करतील. जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो शहर जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अक्षय बाहेती यांनी केले आहे.
मागच्या वर्षी डिप्रेशन मधील तरूणांसाठी मोफत मार्गदर्शन व काऊन्सिलिंग करण्याचा उपक्रम केला होता. त्यावेळी अनेक तरूणांना याचा फायदा करून डिप्रेशन मधून बाहेर काढण्यात यश मिळाले होते. यावेळी यात भर म्हणून कोरोनाने घाबरलेल्या युवकांसाठीही मोफत समुपदेशन मोहीम सुरू करण्यात येत आहे.
– अॅड. अक्षय बाहेती
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विकास दर टिकवण्यासाठी उद्योग आणि सरकारमध्ये पूर्ण विश्वास हवा’
- कोव्हिशील्ड लसीची किंमत निश्चित, असे आहेत नवे दर…
- मनपा निवडणूक न्यायालयीन कचाट्यात! राजकीय पक्षांचे वेट अँड वॉच
- डॉक्टर महिलेची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये समजले ‘हे’
- केजरीवालांना थोडी जरी लाज वाटत असेल तर राजीनामा द्यावा- गौतम गंभीर


