🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी इतर नेत्यांचे देखील फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत होते.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीकेसी सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीला सामोरे जाणार नसल्याची माहिती सध्या मिळत आहे. चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन, असं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला दिलं आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडलं असतानाच आता एका भाजप नेत्याने गंभीर दावा केला आहे. सचिन वाझे यांनी एका पत्रात शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांच्यावर देखील दबाव टाकून खंडणी वसुली करायला लावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी दोन ‘अनिल’ यांच्यासह आणखी काही नेत्यांचे नाव सीबीआय चौकशीत समोर आणल्याचा दावा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
‘आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे.’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 28, 2021
त्यामुळे हैदराबादमधील सीबीआय चौकशीवरून आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. यासोबतच, कोणकोणत्या नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केला आहे ? कोणत्या प्रकरणात त्यांनी या नेत्यांची नावे घेतली आहेत ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला आयसीसीने केले निलंबीत
- ‘गोकुळ’साठी राजू शेट्टींच ठरलं; निवडणुकीत ‘या’ गटाला जाहीर केला पाठींबा
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- ‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’
- ‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
