Share

‘गोकुळ’साठी राजू शेट्टींच ठरलं; निवडणुकीत ‘या’ गटाला जाहीर केला पाठींबा

Published On: 

कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केला आहे. न्यायालयाने सत्ताधारी गटाची याचिका फेटाळून लावली आहे. २ मे रोजी निवडणूक पार पडणार असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अशातच पश्चिम महाराष्ट्रात खास दबदबा असणारे शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी कोणाला पाठींबा देणार याकडं सामान्यांचं लक्ष्य लागलं होतं. आता, राजू शेट्टी यांनी सत्ताधारी गटाला म्हणजेच महाडिक-पी एन पाटील यांच्या गटाला जाहीर पाठींबा दिला असून या गटाचं पारडं आता जड झालं आहे. यामुळे कोल्हापुरातील महाविकास आघाडीतील नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

‘गोकुळने लॉकडाऊन काळातही दूध उत्पादकांना सांभाळून घेतलं. तसंच आमचा गोकुळ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाला विरोध आहे. गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्यावर सत्ताधारी गटाला पाठिंबा देत आहे,’ अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!