Share

रावसाहेब दानवेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतली होती त्यावेळी राज ठाकरे भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर आज (९ एप्रिल) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

यावेळी बोलत असतांना ‘रेल्वेलगतच्या जागांवर असलेली घरं तोडण्याबाबत रेल्वे प्रशासन नागरिकांना वारंवार नोटिसा बजावून त्रास देत असल्याचा मुद्दा गंभीर असून त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी व्यक्त केले. काही महत्वाचे रेल्वे प्रकल्प तसेच रेल्वे नोकर भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य आदी महत्वाच्या विषयांबाबतही ठाकरेंनी यावेळी काही महत्वाच्या सूचना केल्या.

दरम्यान, यावेळी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील तसंच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!