🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. यानंतर पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांना व आंदोलक कर्मचाऱ्यांना रात्री अटक केली. त्यानंतर आज मुंबईतील किला कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली असून कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासांदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिलीप वळसे पाटील म्हणाले की,‘आता सद्यस्थितीत न्यायालयाने हा निर्णय दिला असून सविस्तर निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल.’ तसेच कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात ज्या त्रूटी दिसून आल्या आहेत. त्यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि त्या निर्णया नंतर काल जी घटना घडली ती चुकीची आहे. आता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, सहकार्य करून त्यातून मार्ग काढला पाहिजे’, असे आवाहनही वळसे पाटलांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले.
महत्वाच्या बातम्या
- “झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता
- “याच्या पाठीमागे कोणकोण आहे, हे कळलं पाहिजे”- अजित पवार
- ‘त्या’ घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया; म्हणाले,“सुरक्षेतील त्रुटींची…”
- “आज जर अशी घटना घडली तर…”, चहलला १५व्या मजल्यावरून लटकवणाऱ्या खेळाडूवर शास्त्री संतापले!
- “नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही पण…”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
