Share

“झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यासमोर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधकांकडून शरद पवारांवर टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच आता राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः शरद पवारांसाठी लिहिलेली एक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही कविता शेअर केली आहे. कवितेमध्ये ते म्हणाले आहेत की,‘आघात करण्याचा थांबवा हा प्रघात, जे जे कुणी धजले गेले कधीचे ढगात! ऐंशी पार करुनी तळपतो आहे सूर्यतारा अंधारी, चाचपडणाऱ्यांना हा आधार नभात!’

पुढे ते म्हणाले की, ‘साठ दशकांहूनी मिरवितो पुरोगामी झेंडा, हा बुलंद बुरुज लोकशाहीचा एकची जगात ! झुंडीना भिणारा नाही शूर सह्याद्रीचा सिंह, अंगावरी झेलला ज्याने मुसळधार प्रपात!’, असे आव्हाड आपल्या कवितेमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, आव्हाड यांनी शेअर केलेल्या या कवितेमुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!