मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात अबू आझमी यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. एवढ्या मोठ्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी आवश्यक आहे. या घटनेतील दोषींवर आणि आंदोलकांना हिंसक होण्यासाठी चिथावणी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे’, असे आझमी म्हणाले.
दरम्यान, काल घडलेल्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता
- “याच्या पाठीमागे कोणकोण आहे, हे कळलं पाहिजे”- अजित पवार
- आदर पूनावालांची मोठी घोषणा, बूस्टर डोसची ही असेल किंमत
- …हा हल्ला संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?- प्रविण दरेकर
- IPL 2022 CSK vs SRH : संथ खेळपट्टी अन् तशीच फलंदाजी..! चेन्नईचं हैदराबादला १५५ धावांचं आव्हान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

