Share

मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :आता मराठवाड्यातुन पुण्याला जाणे अधिक सोपे झाले आहे. नव्या वर्षात नांदेड ते हडपसर रेल्वे सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी जालन्यात या रेल्वेचा शुभारंभ केला. त्यामुळे यानंतर अधिकचे भाडे देऊन बस किंवा ट्रॅव्हल्सने जाण्याऐवजी रेल्वेने जाणे सामान्य प्रवाशांना स्वस्त पडणार आहे. द्वितीय श्रेणीत तिकिटासाठी १८५ रुपये तर स्लीपर कोचसाठी केवळ ३१५ रुपये ठेवण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नांदेड ते हडपसर या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली आहे.

जालना येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हडपसर नांदेड या रेल्वेचा शुभारंभ केला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, नांदेड, जालना, परभणी, औरंगाबाद या ठिकाणाहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे विभागाने हे नव्या वर्षाचे गिफ्ट दिले आहे. सध्या या शहरांमधील प्रवासी पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सचा वापर करतात. त्यासाठी आठशे ते हजार रुपयांपर्यंत भाडे देखील ते मोजतात.

मात्र आता यानंतर जालन्यातून पुण्याला जाणे हे अधिकच स्वस्त झाले आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पूर्वी ही रेल्वे परळी मार्गे धावत होती. कोरोना काळात ती बंद करण्यात आली होती. मात्र आता मार्ग बदलून थेट मराठवाडा मार्गावरून ती चालवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अनेक बदल करण्यात आले आहेत. एलएचबी डब्बे हे या गाडीचे वैशिष्ट आहे. या सुविधेमुळे रेल्वेला गती मिळणार आहे. नांदेड वरून ही रेल्वे रात्री साडेआठ वाजता तर जालन्या वरून रात्री साडेअकरा वाजता निघून पुण्यामध्ये पहाटे पोहोचेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!