🕒 1 min read
औरंगाबाद : ‘ज्या आजपर्यंत कधीही गांधी भवनमध्ये दिसल्या नाही, ना कुठल्या कार्यक्रमात दिसल्या नाही. शहराध्यक्ष पदावर नियुक्ती झालेली आहे. मुळात दोन्ही महिला पदाधिकारी औरंगाबादमधील नसून नांदेड आणि परभणी येथील आहेत. असे असतांनाही औरंगाबाद शहराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर कशी देण्यात आली? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे अजून माझा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपलेला नाही. त्यामुळे या नियुक्त्या आम्हाला मान्य नाही’. अशी संतप्त प्रतिक्रिया तत्कालीन शहराध्यक्ष सीमा थोरात(Seema Thorat) यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना दिली.
औरंगाबाद शहरातील महिला काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही शहराध्यक्षांना पदावरुन काढण्यात आले आहे. त्यामुळे महिला काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. याबाबत विद्यमान अध्यक्षा म्हणाल्या, या नियुक्त्या कुठल्या निकषांवर केल्या ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे शहरातील आम्ही काही महिला पदाधिकारी लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडणार आहोत.
या फेरबदलामध्ये शहराध्यक्ष सीमा थोरात यांना कार्यकारी कमिटी सदस्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, शहराध्यक्ष पदाचा माझा कार्यकाळ अजून संपलेला नाही अजून २ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतांना अशा प्रकारे फेरबदल कसे केले जाऊ शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे नाराज महिला पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत होत्या. मात्र प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी वेळ दिल्यामुळे तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. प्रदेशाध्यक्षांसोबत भेट झाल्यानंतर त्यांचे समाधान झाल्यानंतर आम्ही काय तो निर्णय घेऊ असेही थोरात म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा
- ‘… त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करताय’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “…पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव”, भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
- “म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
