मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ अशा शब्दात टीका केली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील टीका करत निवडणुकांच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय असल्याचे म्हणले आहे.
मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या या घोषणेनंतर भाजप कडून झालेल्या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्यांची ही पोटदुखी आहे, त्यांना आधी वाटायचं हे होणारच नाही, पण आता ते शक्य झाले आहे म्हणून कुठे ना कुठे भांडणं लावायची आणि मुंबईकरांना गुमहान करायचं, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे.
पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईकरांना जे चांगलं द्यायचं आहे, ते देण्यास आम्ही बांधिल आहोत, टी बांधिलकी आपण या एकेक गोष्टीतून पालट आहोत हीच त्यांची बांधिलकी आहे. मग कुठेच काही नाही म्हणून आगी लावत सुटायचं काम भाजप नेत्यांककडून केलं जात आहे. याची सुपारी आशिष शेलार यांनी उचलली आहे, असं म्हणत त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर देखील निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- माझा कार्यकाळ अजून संपलेला नाही, या नियुक्त्या आम्हाला मान्य नाही; माजी शहराध्यक्ष थोरात संतापल्या!
- सरकारी वाहनांबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
- औरंगाबादेतील महिला काँग्रेसमध्ये मोठे बदल; नाराज पदाधिकारी घेणार नाना पटोलेंची भेट..!
- शिवसेना आमदार तानाजी सावंत भाजपमध्ये जाणार का?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- महिलांच्या ऑनलाईन बदनामी प्रकरणी नवाब मलिक लिहणार गृहमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

