🕒 1 min read
औरंगाबाद: ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार आणि लेखक भारत सासणे(Bharat Sasane) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लातूर जवळील उदगीर मध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. डिसेंबर मध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये झाले होते. त्यावेळी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोल तज्ज्ञ जयंत नारळीकर(Jayant Narlikar) यांची वर्णी लागली होती. नाशिक मधील साहित्य संमेलन हे वाद विवादांनी अधिक गाजले. आता उदगीर मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडण्यासाठी रविवारी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याबाबत घोषणा केली. लवकरच तारखांबाबत घोषणा करण्यात येणार आहे. भारत सासणे यांचा जन्म मराठवाड्यातील जालना येथे २७ मार्च १९५२ रोजी झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले.
पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडतात. भारत सासणे यांना लेखनाबद्दल राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. त्यांच्या कथांमध्ये ग्रामीण, आदिवासी, नागर या समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा
- ‘… त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करताय’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “…पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव”, भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
- “म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
