नवी दिल्ली : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, जरी वय ४० वर्षे झाले असले, तरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकत नाही.
तो एका माध्यमाशी बोलताना म्हणाला की, “मी संघावरती बोज्या नाही. आणि अजूनही टी२० क्रिकेट खेळू शकतो. जर कर्णधार बाबर आझमने विचार केला, तर या वर्षीचा टी२० विश्वचषक मी खेळू इच्छित आहे. माझे वय जास्त असूनही मला कोणीच म्हणू शकत नाही. की संघावर बोज्या आहे. मी मोठ्या स्तरावर चांगले प्रदर्शन केले आहे. मी टी२० क्रिकेटमध्ये चेंडू, बॅट आणि क्षेत्ररक्षणमध्ये पूर्णपणे माझे योगदान दिले आहे. मी क्रिकेटचा खूप आनंद घेतला आहे.
तो येणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी खेळण्याबद्दल म्हणाला की, मी निश्चितच माझ्या देशासाठी खेळू इच्छित आहे. मी सन्मानाने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ इच्छित आहे. जर बाबरने मला खेळण्यासाठी विचारले तर मी निश्चितच खेळेल.” असे ही तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :


