नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने दिग्गज जलदगती गोलंदाज शोएब अख्तरबद्दल एक मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की अख्तरबद्दल एका शब्दात सांगितले जाऊ शकत नाही. तो एक पुस्तक आहे.
एका चाहत्याने त्याला विचारले की अख्तर बद्दल एका शब्दात सांगा. त्यावर आफ्रिदी म्हणाला तो एक पुस्तक आहे. त्याच्याबद्दल एका शब्दात सांगणे अवघड आहे.
पाकिस्तानी न्युज समा टीव्हीवर बोलताना आफ्रिदी अख्तरबद्दल म्हणाला, “तुम्ही त्याच्यासाठी फक्त एका शब्दाचा वापर करू शकत नाही. तो एक पूर्ण पुस्तक आहे. मी खूप क्रिकेट खेळलो आहे. आणि बऱ्याच दिग्गज गोलंदाजाना पहिले आहे. परंतु अख्तरकडे जी बहादुरी होती. ज्यामुळे फलंदाजांमध्ये त्याची दहशत होती. त्याचा सामना करताना फलंदाज खूप घाबरायचे. पाकिस्तानसाठी त्याने खूप चांगले प्रदर्शन केले आहे.”
अख्तरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४६ कसोटी, १६३ वनडे आणि १५ टी२० सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
