🕒 1 min read
मुंबई: विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीवरून राज्यसरकारला चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या जागेवर मुख्यमंत्री म्हणून इतर कुणाला बसवावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशन काळात मुख्यमंत्रिपदाचे अधिकार अजित पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर खोचाक शब्दात टीका केली आहे.
भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ही गोष्ट काही सांगण्याची नाही. ते आजारातून लवकर बरे व्हावेत अशी आमच्या पक्षाची आणि माझी व्यक्तिगत भूमिका आहे. पण जर ते लवकर बरे झाले नाही तर या राज्याला प्रमुख तर नेमला पाहिजे, असं रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी या राज्यातील १२ कोटी जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावं, अशी देखील इच्छा व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, विना प्रमुखाचं हे राज्य कसं चालेल, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच एकनाथ शिंदेंसारखा (Eknath Shinde) सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. कुणालाही द्या, राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या. संधी दिली पाहिजे, असंही भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नमूद केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध’
- म्हाडाच्या रद्द झालेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा
- ‘पंढरपूर पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे आलेल्या वैफल्यातून…’; चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीवर टीका
- सरकार असो वा नसो जनतेच्या सेवेत खंड पडता कामा नये- सुधीर मुनगंटीवार
- “महामानव महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे”, रुपाली पाटलांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
