Share

‘पंढरपूर पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे आलेल्या वैफल्यातून…’; चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीवर टीका

Published On: 

पंढरपूर: नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आनंदाचा व उत्साहाचा असतो, मात्र पंढरपूरमध्ये वेगळाच प्रकार बघायला मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कार्यकर्ते व भाजपचे (BJP) कार्यकर्ते यांच्यात वाद झाले. त्यामुळे पंढरपूर (Pandharpur) येथील मंदिर परिसरात तानावाचे वातावरण निर्माण झाले होते.भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने हा वाद पेटला होता.

आचार्य तुषार भोसले हे पंढरपुरात मंदिरात दर्शनाला आले. यावेळी तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँगर्सेचे कार्यकर्ते आले होते. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी त्यांना रोखले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या प्रकारचा भाजप नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सोशल मिडियावर आपले मत व्यक्त केले आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेरच आलेले नाहीत. त्यामुळेच आमच्या आचार्य तुषार यांच्याशी गैरवर्तनाचा प्रकार घडलाय. या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो. तसेच संबंधितांवर सरकार कारवाई करणार की त्यांना पाठीशीच घालणार, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!