🕒 1 min read
मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. असे असले तरीही जगभरात २०२२ चे स्वागत जल्लोषात आणि नवीन आशेने केले असून देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी ट्विटच्या माध्यमातून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वर्षभर केलेल्या कार्यांचा एक व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. ते म्हणाले आहेत की,’मागील वर्षात अनेक संकटे आली, परंतु या संकटांना सामोरे जात जनतेच्या सेवेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. सरकार असो वा नसो जनतेच्या सेवेत खंड पडता कामा नये हे धोरण निश्चित करून विकासकामांची घोडदौड कुठेही थांबू दिली नाही.हे वर्ष सर्वांना सुखः समृद्धीचे लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो.’
मागील वर्षात अनेक संकटे आली, परंतु या संकटांना सामोरे जात जनतेच्या सेवेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. सरकार असो वा नसो जनतेच्या सेवेत खंड पडता कामा नये हे धोरण निश्चित करून विकासकामांची घोडदौड कुठेही थांबू दिली नाही.हे वर्ष सर्वांना सुखः समृद्धीचे लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो pic.twitter.com/C1eTGUm2vN
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) January 1, 2022
दरम्यान, नववर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस हा अन्नदात्याला समर्पित केला असून पीएम किसान योजनेचा २,००० रुपयांचा १० वा हप्ता नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
