मुंबई : म्हाडाच्या (MHADA exam) परीक्षात घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून येणाऱ्या २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार या परीक्षा आता ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून होणार आहेत. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. २९, ३० आणि ३१ जानेवारी तसेच १ ते ३ फेब्रुवारी रोजी या परीक्षा होणार आहेत.
म्हाडातील १४४ पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्यासाठी १२ ते २० डिसेंबरदरम्यान परीक्षा होणार होती. ही परीक्षा देण्यासाठी दोन लाखांहून अधिक जास्त अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना, राज्य सरकारने ही परीक्षा रद्द केली होती. त्यामुळे लाखो उमेदवारांचा वेळ वाया गेला होता. परीक्षेला बसता न आल्याने उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
म्हाडा परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या एका संचालकाने प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न केला होता. पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करून कंपनीच्या संचालकाला आणि दलालांना अटक केली होती. या प्रकारानंतर म्हाडाने परीक्षा घ्यावात असे सरकारने जाहीर केले. त्यानुसार म्हाडा आता ऑनलाइन परीक्षा घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकार असो वा नसो जनतेच्या सेवेत खंड पडता कामा नये- सुधीर मुनगंटीवार
- “महामानव महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे”, रुपाली पाटलांची मागणी
- पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये धक्काबुक्की, तणावाचे वातावरण
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजपच जबाबदार; मलिकांच्या निशाण्यावर भाजप
- रणबीर सोबत हॉलिडेचे खास फोटो शेअर करत आलिया म्हणाली ‘हकुना मटाटा’


