मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वात लक्षणीय बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, सरकार कोणत्या भावनेने हे करतंय, त्याचा उद्देश मला माहित नाही. केवळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील याचंच नव्हे तर माझ्यासह अनेक प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढली. पण याबाबत आम्ही सरकारकडे दाद मागणार नाही. कारण आमचं संरक्षण पोलीस करते असं नाही तर राज्यातील जनता आमची सुरक्षा करते. त्यामुळे सुरक्षेत कपात केल्याने आमच्या कामात तसूभर ही फरक पडणार नाही आणि आम्ही हादरणारही नाही, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल,कॉंग्रेस नेत्याचे सोनिया गांधींना पत्र
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते – उद्धव ठाकरे
- माझी सुरक्षा कमी करा; शरद पवारांचा अनिल देशमुखांना फोन!
- आता अजित पवार यांच्या पत्नीलाही मिळणार सुरक्षा !


