Share

मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे

Published On: 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.

तर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात २५ जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार आहे. याआधी पुन्हा एकदा आरक्षणावरून राजकारण पेटताना दिसत आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा नेते हे दोन समाजात फूट पडत आहेत असा आरोप केला आहे.

काही नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. यानंतर, ओबीसी समाजाने या मागणीचा तीव्र विरोध केला होता. आरक्षण अबाधित राहावं यासाठी ओबीसी समाजाने मोर्चे देखील काढले होते. शेंडगे म्हणाले, ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याला आमचा विरोध आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयाला भटक्या विमुक्त समाजाचा टोकाचा विरोध आहे.’

तर, ‘मराठा समाजाचे नेते राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. तशी वक्तव्यही मराठा नेत्यांकडून होत आहेत. ओबीसी समाज हे कदापिही सहन करणार नाही,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. दरम्यान, त्यांनी मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या एम.जी गायकवाड कमिशनवर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड कमिशन हे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं फिक्सिंग असून गायकवाड कमिशनच्या अहवालाला आमचा विरोध आहे. या अहवालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे,’ असा खुलासा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!