मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर, काही नेत्यांच्या अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री असताना पवारांच्या पत्नीला सुरक्षा नव्हती. मात्र आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची सुद्धा वाय प्लस सुरक्षा रद्द केली आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल,कॉंग्रेस नेत्याचे सोनिया गांधींना पत्र
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते – उद्धव ठाकरे
- वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भिडे गुरुजींची भेट
- ‘शेतकऱ्यांच्या भल्याची भाषा करणाऱ्या ठाकरे सरकारने मदत करताना दगा केला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

