मुंबई : महाविकास आघाडीत शीतयुद्ध सूरच असल्याचे दिसून येत आहे. कारण मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू रॉय यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेविरोधात तक्रार केली आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना तसं पत्रच रॉय यांनी दिलं आहे.
शिवसेना नेत्यांचे घोटाळ्यांमध्ये नाव येत असल्यानं त्याचा धोका कांग्रेसला असल्याची तक्रार विश्वबंधू रॉय यांनी केली आहे. सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल, अशी भीतीही रॉय यांनी पत्रात नमूद केली आहे. TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान,विश्वबंधू रॉय यांनी पहिल्यांदा पत्र लिहिले आहे असे नाही यापूर्वीही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप रॉय यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत कपात तर, आठवलेंच्या सुरक्षेत वाढ : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कऱ्हाडात कमराबंद चर्चा!
- ‘शेतकऱ्यांच्या भल्याची भाषा करणाऱ्या ठाकरे सरकारने मदत करताना दगा केला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

