मुंबई:- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर, काही नेत्यांच्या अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना एस्कॉर्ट शिवाय अधिकची सुरक्षा देण्यात आली आहे. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतल्यानंतर यावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सुरक्षा कमी केल्याने भाजप नेते राज्य सरकारवर टीका करत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करा असं म्हंटल आहे. याबाबत शरद पवार अनिल देशमुखांना पत्र लिहून मागणी करणार आहेत.
गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला होता, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे? यावर सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवाला नुसार अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणीही विरोधी पक्षाचा आहे, म्हणून सुरक्षा कमी करण्यात आली नाही. समितीच्या अहवालनुसार थ्रेट परसेप्शन किती यावर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल,कॉंग्रेस नेत्याचे सोनिया गांधींना पत्र
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- सिडनी आणि वाद हा जुनाच; 2008 मध्येही घडले होते ‘असे’ काही…
- औरंगाबादसाठी ‘या’ मॉडेलने नाकारली ‘तुझ्यात जीव रंगला’तील भुमिका
- आता अजित पवार यांच्या पत्नीलाही मिळणार सुरक्षा !


