भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवजात बालकांचं वय हे अवघ्या काही दिवसांपासून ते 3 महिन्यांपर्यंतचं होतं. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. या दुर्घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. यावेळी विधानसभेचे सभापती नाना पटोले, पालकमंत्री विश्वजीत कदम हे देखील ठाकरेंच्या सोबत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी बाळांच्या कुटुंबियांना भेटलो. हात जोडून उभं राहण्याखेरीज माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. सांत्वन करता येईल असे कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीयेत. चौकशी झालीच पाहिजे. हा अपघात हा अचानक झाला आहे की आधी धोक्याचा अहवाल आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, हे तपासलं जाईल. तसेच, कोरोनाच्या संकटाचा सामना करताना इतरत्र दुर्घटनेच्या शक्यतेकडे डोळेझाक केलं गेलं आहे का याच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी एक समिती तयार केली आहे. ती संपूर्ण चौकशी करणार आहे.’
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत कपात तर, आठवलेंच्या सुरक्षेत वाढ : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल,कॉंग्रेस नेत्याचे सोनिया गांधींना पत्र
- ठाकरे सरकारचा दणका; राणे, चंद्रकांतदादांची वाय प्लस सुरक्षा रद्द!
- ‘गांधी परिवाराला धोका असतानाही सुरक्षा कमी करताना भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

