मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये मनीष पांडेला लखनऊ सुपर जायंट्सने ४.६० कोटी रुपयांना संघात सामील केले आहे. आयपीएलपूर्वीच मनीष पांडेने हे सिद्ध केले आहे की या नवीन फ्रँचायझीने त्याच्यासाठी एवढे पैसे का खर्च केले आहेत. रणजी ट्रॉफी २०२१-२२ हंगामातील पहिल्याच सामन्यात कर्नाटकच्या कर्णधार मनीष पांडेने दहशत निर्माण केली होती.
रेल्वेविरुद्ध कर्नाटकाचा कर्णधार मनीष पांडेने १२१ चेंडूंत १२ चौकार आणि १० सिक्सरच्या मदतीने १५६ धावा केल्या आहेत. मनीष पांडेने ८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. २२ चौकारांच्या जोरावर १०८ झाल्या सिक्सर मदतीने ६० धावा केल्या. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी स्वीकारणाऱ्या कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर५ विकेट गमावून ३९२ धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या रूपाने संघाला २७ धावांवर पहिला धक्का बसला. अवघ्या १६ धावा करून मयंक पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर देवदत्त पडकलनेही अवघ्या २१ धावा केल्या.
कर्नाटक संघाने आपले सलामीवीर ५० धावांवर गमावले होते. येथून कृष्णमूर्ती सिद्धार्थने रविकुमार समर्थसोबत ६० धावांची भागीदारी करत संघाला पुढे नेले. समर्थने ४७ धावांची खेळी खेळली. तो बाद झाल्यानंतर सिद्धार्थने कर्णधार मनीष पांडेसह चौथ्या विकेटसाठी २६७ धावांची भागीदारी करत कर्नाटकला मजबूत स्थितीत आणले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्जुनचे सामने पाहायला मी कधीच जात नाही ; कारण…
- टीका करून जे गाजावाजा करतात … ; उदय सामंत यांचा राणेंना टोला
- राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेना नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ”या” नेत्याकडे ५ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी
- युपी बिहारी भैय्यांबाबतच्या वक्तव्यावर चरणजित सिंग चन्नी यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

