पुणे : राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले आणि शिवसेना पक्षात वरिष्ठ पातळीवर काम करणारे नेते किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष c (Raghunath Kuchik) यांच्यावर पुण्यात बलात्काचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २४ वर्षीय मुलीने रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध पुणे पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे अमिष दाखवून कुचिक यांनी वारंवार शरीर संबंध ठेवले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी माझा गर्भपात पण घडवून आणला असे २४ वर्षाच्या युवतीने पोलिसांच्या तक्रारीत म्हंटले आहे. रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेले काही वर्ष रघुनाथ कुचिक यांनी मला लग्नाचे अमिष दाखवले आणि गोव्याला जाऊन माझ्याशी शरीर संबंध ठेवले. तसेच गर्भवती राहिल्यावर जीवे मारण्याच्या धमकी देऊन रघुनाथ कुचिक यांनी गर्भपात करवला असे पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. मात्र या आरोपांवर रघुनाथ कुचिक यांनी अद्याप आपली बाजू मांडली नाहीये.
महत्वाच्या बातम्या :
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ”या” नेत्याकडे ५ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी
- युपी बिहारी भैय्यांबाबतच्या वक्तव्यावर चरणजित सिंग चन्नी यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
- ‘निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’; कॉंग्रेसची मागणी
- IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध
- शिवरायांच्या पुतळ्याचे रात्री होणाऱ्या अनावरण प्रकाराबद्दल भागवत कराडांनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

